S M L

अजित पवारंना 'सोमेश्वर' पावला

Samruddha Bhambure | Updated On: Apr 17, 2015 06:22 PM IST

ajit pawar ncpe

17  एप्रिल : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना बारामतीच्या सोमेश्वर सहकारी कारखान्यावर स्वतःचं वर्चस्व कायम राखण्यात यश आलंय. आतापर्यंत 21 जागांपैकी 16 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्या सर्व जागा अजित पवारांच्या सोमेश्वर विकास पॅनेल आघाडीनं जिंकल्यात. असून त्यांच्या विरोधात उभे असलेले काकडे पॅनेलचे प्रमुख सतीश काकडे यांच्या जनशक्ती पॅनेलला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत साखर उद्योगातील ज्येष्ठ तज्ज्ञ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेवृत्वाखालील शेतकरी बचाव सहकारी पॅनेलने एकूण 21 जागांपकी 15 जागेवर घवघवीत यश मिळवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली होती. त्यामुळे सोमेश्वरच्या निकालाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सतिश काकडे आणि त्यांचे भाऊ प्रमोद काकडे या दोघांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. प्रमोद काकड यांनी आपला पराभव मान्य केला आहे. पण पैशाच्या जोरावर अजित पवार यांनी ही निवडणूक जिंकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2015 06:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close