S M L

माओवादी ढालीसारखा वापर करायचे आणि लैंगिक शोषणही, एका 'मर्दानी'चा जबाबनामा

Sachin Salve | Updated On: Apr 18, 2015 06:05 PM IST

माओवादी ढालीसारखा वापर करायचे आणि लैंगिक शोषणही, एका 'मर्दानी'चा जबाबनामा

18 एप्रिल : "त्यांनी आमचा ढालीसारखा वापर केला...ते पोलिसांना घाबरायचे म्हणून ते लहान मुलांना पुढे आणि मागे ठेवायचे आणि ते स्वत: आत असायचे...त्यांनी आमचं लैंगिक शोषणही केलं" असा धक्कादायक खुलासा एका धाडसी अल्पवयीन मुलीने केलाय. माओवाद्यांच्या मगरमिठ्ठीतून सुटका करून घेतल्या या मुलीने माओवादी भरती प्रक्रियेचं भयावह वास्तव उघड केलंय.

नेहमी बंदुकीच्या धाकावर गावकर्‍यांना वेठीस धरणार्‍या माओवादी आता त्यांच्याच मुळावर उडले आहे. आजपर्यंत गावकर्‍यांना सामोरं करून छुपी लढाई सुरू आहे. पण, आता तर अल्पवयीन मुली, स्त्रियांना आपल्या लढाईसाठी ढाली सारखा वापर करत आहे. याहुन धक्कादायक म्हणजे ज्यांचा ढालीसारखा वापर केला त्याच मुलींचं लैंगिक आणि शारिरीक शोषण केल्याची शर्मेची बाब उजेडात आलीये. माओवाद्यांच्या तावडीतून एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने स्वत:चा सुटका करून घेतली. त्यानंतर तिनेही भयावह हकिकत पोलिसांना सांगितली. आपल्यासोबत घडलेल्या या कठिण प्रसंगाचा तिने पाढाच वाचला. माओवादी मुलींचं शारिरीक शोषण करतात आणि यात अनेक अल्पवयीन मुलीसुद्धा आहे, असं या मुलीनं सांगितलं. इतकंच नाही तर माओवादी पोलिसांशी लढताना लहान मुलं, स्त्रिया यांचा ढालीसारखा वापर करतात, असंही तिनं सांगितलं. माओवाद्यांनी 2014 च्या जुलैमध्ये या मुलीच्या वडिलांना धमकावून तिला बळजबरीनं घेऊन गेले होते. झारखंडमधल्या लाथेहारमधून मार्च 2015 मध्ये माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत या मुलीलाही गोळ्या लागल्या होत्या. तेव्हाच पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिच्यावर अजूनही रांचीमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

काय सांगितलं 'ति'ने...

पोलीस : तुझ्याबरोबर तसं केल्यावर तू इतर मुलींना सांगितलं का?

पीडित : हो मी सांगितलं

पोलीस : त्यांनी इतर मुलींवरही अत्याचार केले का?

पीडित : हो, इतर मुलींवरही केले

पोलीस : कुणी केले?

पीडित : माओवाद्यांनी

पोलीस : हे तुला कसं कळलं?

पीडित : मुलींनीच मला सांगितलं

पोलीस : त्यांनी काय केलं?

पीडित : त्यांनी खूप वाईट काम केलं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2015 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close