S M L

'अपघाताच्या वेळी सलमानची गाडी 30 -40 किमी वेगात होती'

Sachin Salve | Updated On: Apr 18, 2015 08:08 PM IST

64577hit-and-run-salman34618 एप्रिल : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. अपघाताच्या वेळी सलमानची टोयोटा लँडक्रूझर ही गाडी 30-40 किलोमीटर वेगात होती, असा युक्तिवाद बचावपक्षानं केलाय.

जर सलमानची गाडी पहाटे सव्वा दोन वाजता जे डब्ल्यू मॅरियटवरून 90 ते 100 च्या वेगात असती, तर ती अपघाताच्या ठिकाणीे 5 मिनिटांतच पोहोचली असती असा दावाही बचावपक्षानं केलाय.

विशेष म्हणजे सलमानचे वकिल श्रीकांत शिवदे यांनी शुक्रवारी कोर्टात सलमानच्या गाडीने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नसून तो क्रेनच्या धक्क्याने झाला असा युक्तीवाद केला होता. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता सोमवारी होणार असून अंतिम सुनावणीची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2015 08:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close