S M L

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2015 04:49 PM IST

akhada

20 एप्रिल : औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. 22 एप्रिलला या दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. नवी मुंबईत एकूण 111 जागांसाठी महापालिका निवडणूक होतं असून औरंगाबादमध्ये 113 जागांसाठी निवडणूक होत आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व पक्ष ताकदीने प्रचारात उतरले आहेत. उमेदवारांनी प्रचारफेर्‍या आणि घरोघरी प्रचार करण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्याच बरोबर रॅली घेऊन मतदारांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपने युती कायम ठेवत एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र दोन्हीकडे स्वतंत्रपणे लढणार आहे. नवी मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते उद्धव ठाकरे, शरद पवारांपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. आता या निवडणुकीत गणेश नाईकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तर औरंगाबादमध्येही सर्व पक्षांचे प्रदेशाध्यक्ष तळ ठोकून बसले आहेत. औरंगाबादमध्ये एमआयएमही निवडणूक लढवत असल्याने ओवेसी बंधुही प्रचारात स्वत: सहभागी झाले होते. 22 एप्रिलला मतदान होऊन 24 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2015 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close