S M L

नाट्यपरिषदेत धुसफूस नाट्य, उदय सामंतांनी दिला राजीनामा

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2015 03:53 PM IST

नाट्यपरिषदेत धुसफूस नाट्य, उदय सामंतांनी दिला राजीनामा

20 एप्रिल : नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळातला वाद उफाळून आला असून नियामक मंडळाचे सदस्य आमदार उदय सामंत यांनी राजीनामा दिलाय. राजकीय व्यस्ततेमुळे राजीनामा दिल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. मात्र,यामागे मोहन जोशी आणि उदय सामंत यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचं बोललं जातंय.

मोहन जोशी आणि उदय सामंत यांच्यात बेळगाव नाट्य संमेलनापासून वाद सुरू होते. बेळगाव नाट्यसंमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यावरून या दोघांमध्ये ठिणगी पडली होती. उद्धव ठाकरेंचं त्यावेळी पत्रिकेत नाव छापलं पण त्यांना बोलावणे आले नाही यावरूनही दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. समारोपाच्या कार्यक्रमात दिवाकर रावतेंनीही याप्रकरणी नाट्यपरिषदेचे कान उपटले होते. मोहन जोशींच्या बेताल वक्तव्यांचाही आमदार उदय सामंत यांनी त्यावेळीही जाहीर विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उदय सामंत विरूद्ध मोहन जोशी असे दोन गट पडले होते. या दोघांच्या वादाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आमदार उदय सामंत यांनी नाट्यपरिषद नियामक मंडळाचा राजीनामा दिल्यानंतर इतर सदस्य कुणाच्या बाजूने जातायत याकडे आता लक्ष लागलंय. एकूणच हा वाद चांगलाच रंगणार असल्याचं दिसतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2015 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close