S M L

आराखडा रद्द, शिवसेनेकडून निर्णयाचं स्वागत

Sachin Salve | Updated On: Apr 21, 2015 03:52 PM IST

cm on uddhav21 एप्रिल : मुंबईचा विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेला तसे आदेश दिले आहे. या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलंय.

मुंबई विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याची बातमी ऐकून आनंद झाला अशी प्रतिक्रिया युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी टिवट्वर दिली. मुंबईकरांचं हित होत नसेल तर आराखडा रद्द व्हावाच अशी मागणी अगोदरच केली होती असंही आदित्य म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी काय ट्वीट केलंय ?

"मुंबईचा विकास आराखड्याचा मसुदा मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याची बातमी ऐकून आनंद झाला. हा डीपी रद्द करून फेरआढावा घ्या, असं याआधीही आम्ही म्हटलं होतं. सामान्य मुंबईकरांचं हित होत नसेल तर असा डीपी रद्दच करावा, असं उद्धवजी यांनीसुद्धा म्हटलं होतं."

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2015 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close