S M L

असला आराखडा तयार करणार्‍यांवर कारवाई करा -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Apr 21, 2015 09:06 PM IST

raj thakre21 एप्रिल : मुंबईचा विकास आराखडा रद्द झाला ही चांगली गोष्ट आहे. पण, जनतेची दिशाभूल करणारा असा आराखडा परत कुणी करू नये यासाठी या आराखड्यात असलेल्या तज्ञ आणि अधिकार्‍यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीये.

मुंबईचा विकास आराखडा राज्य सरकारने आज रद्द केलाय. नवा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश मुंबई पालिकेला देण्यात आले आहे. आराखड्याला विरोध करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केलंय. आराखडा रद्द केला याबद्दल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही केलंय. तसंच आराखडा रद्द होण्याचं श्रेय मराठी जनतेला दिलंय. जनतेच्या रेट्यामुळे हा आराखडा रद्द झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. तसंच त्यांनी आराखडा तयार करणार्‍या अधिकार्‍यांना चांगलंच धारेवर धरलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात हा आराखडा बनला होता. तोच आराखडा याही सरकारने पुढे रेटला. या आराखड्यावर पालिकेनं तब्बल 8 कोटी रुपये खर्च केले. आता ते पाण्यात गेले आहे. त्यामुळे जे कुणी या विकास आराखड्यात सामिल होते. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पुढे चालून कुणाची अशी हिंमत झाली नाही पाहिजे. कुणी कुंटे असतील खुंटे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2015 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close