S M L

पुण्यात दोन मुलींचा खुन

15 ऑक्टोबर पुणे परिसरात गेल्या दोन दिवसांत दोन मुलींचे खुन झाल्याचं उघड झालं आहे. शिरुर तालुक्यातील मुखई येथील सुलोचना पलांडे ही 14 वर्षांची विद्यार्थीनी मंगळवारी संध्याकाळी घराबाहेर पडली होती. रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्यानं तिच्या घरच्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण बुधवारी सकाळी जवळच्याच शेतात तिचा मृतदेह सापडला. सुलोचनाचा गळा आवळून खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर गुरूवारी पुण्यातील नारायण पेठे जवळील प्रभात प्रेसजवळ एका घरकाम करणार्‍या महिलेच्या मुलीचा मृतदेह सापडला. ही मुलगी 10 वर्षांची असून तिचाही खुन झाल्याचा संशय आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2009 12:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2009 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close