S M L

औरंगाबादेत 65 तर नवी मुंबईत 51 टक्के मतदान, आता निकालाची प्रतीक्षा

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2015 10:16 PM IST

औरंगाबादेत 65 तर नवी मुंबईत 51 टक्के मतदान, आता निकालाची प्रतीक्षा

votingunreal22 एप्रिल :: नवी मुंबई महापालिका आणि औरंगाबाद महापालिकेसाठी आज दोन चार घटना वगळता शांततेत मतदान पार पडलं. औरांगाबादेत विक्रमी 65 टक्के मतदान झालंय. तर नवी मुंबईत फक्त 51 टक्के मतदान झालंय. औरंगाबादेत 113 उमेदवारांचं तर नवी मुंबईत 111 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. नवी मुंबईत राष्ट्रवादी आपला गड कायम राखते की, सत्ता परिवर्तन होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर औरंगाबादेत शिवसेना पुन्हा भगवा फडकवते हे पाहण्याचं ठरणार आहे.

मतदान उत्साहात

औरंगाबाद शहरातील मोठ्या नेत्यांनी सकाळी आठवाजेच्या आत मतदानाचा हक्क बजावला. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या तीन्ही पिढीनं एकत्र येऊन मतदानाचा हक्क बजावला. माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनीही मतदान केलं. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनीही मतदान केलं.. सकाळी 11 वाजेपर्यंत उत्साहात 35 टक्के मतदान झालं. मात्र 12 वाजेच्या नंतर तापमान वाढल्यानं मतदान मंदावलं. दुपारी चार वाजेनंतर मतदानासाठी नागरीकांच्या पुन्हा रांगा लागल्या. विशेष म्हणजे, औरंगाबादेत अगोदरच पाण्याची टंचाई असल्यामुळे नेमकं दुपारी पाणी आल्यामुळे महिलांची त्रेधातिरपट उडाली. तीन दिवसाआड पाणी येत असल्यामुळे पाणी भरायचं की, मतदान करायचं असा यक्ष प्रश्नच महिलांना उपस्थित केला.

औरंगाबादेत मतदानाला गालबोट

एमआयएम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल आधीच खुन्नस होती. त्यामुळं साडे चार वाजता दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये रशिदपुरा भागात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत तीन कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी गणेश नगर भागातील एमआयएमचे उमेदवार नासर सिद्दीकीला पोलीसांनी ताब्यात घेतलं. तर बायजीपुरा ,इंदिरानगर भागात मतदान संपेपर्यंत दोनदा दगडफेक झाली. जवळपास 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं. खडकेश्वर भागात पाच महिलांना बोगस मतदान करताना पकडल्याचा दावा पोलिसांनी केलाय. सिटी चौक पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलंय. तर अनेक मतदान केंद्रांवर उत्साही नागरीकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी सात वेळा सौम्य लाठीचार्ज केला. महापालिकेच्या 2010 च्या निवडणुकीत 61 टक्के मतदान झालं होतं. यंदा 4 टक्क्याने मतदान वाढलं असून 64 टक्के मतदानाची नोंद झालीये.

नवी मुंबईत मतदानाला निरुत्साह

नवी मुंबईत आज मतदारांचा फारसा उत्साह दिसला नाही. इथे फक्त 49 टक्के मतदान झालं. नवीमुंबईमध्ये काही बोगस मतदानाच्या घटनाही घडल्या. नेरूळमधील वॉर्ड नंबर 85 मध्ये 4 बोगस मतदारांना पकडण्यात आले आहे. शिवसेना खासदार राजन विचारेंनी या 4 बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. नवी मुंबई गणेश नाईक आपला गड राखणार का, याबद्दल उत्सुकता लागलीय.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2015 08:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close