S M L

जैतापूर प्रकल्प हा वैयक्तिक गर्वाचा प्रश्न करु नका - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Apr 22, 2015 11:09 AM IST

uddhav thackray

22 एप्रिल : जैतापूर प्रकल्प हा वैयक्तिक गर्वाचा प्रश्न करु नका, महाराष्ट्राचं हित पाहूनच निर्णय घ्या, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांना लगावला आहे. शिवसेनेतर्फे काल (मंगळवारी) वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा विषय केंद्र सारकारने किमान समान कार्यक्रमात समाविष्ट केला पाहिजे. पंतप्रधान मोंदी यांनी अलिकडेच जर्मनीला भेट दिली. तेव्हा तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी अणुऊर्जा प्रकल्प किती धोकायक ठरु शकतात हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते, असं असतानाही थोड्या फार विजेकरिता शंभर धोका महाराष्ट्राने का पत्कारायचा या भूमिकेवर आपण आजही ठाम आहोत. एवढचं नाही तर, ज्या राज्यांना हा प्रकल्प हवा असेल, त्यांनी तो घेऊन जावा, असं ते म्हणाले.

तर मुंबईच्या विकास आराखड्याबाबत शिवसेनेनेच सर्वप्रथम आवाज उठवला आणि सर्वसामान्य मुंबईकरांच्या भावनेला वाचा फोडली. त्या विषयावर मुखयमंत्र्यांना पत्र लिहिलं असून, आपली मतं व्यक्त केली आहेत. त्यांची दखल नव्या सुधारित आराखड्यात घेतली जाईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2015 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close