S M L

देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस- इम्तियाज जलील

Samruddha Bhambure | Updated On: Apr 22, 2015 01:43 PM IST

देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस- इम्तियाज जलील

22 एप्रिल : 'औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीतील गैरप्रकारामुळं संतापलेले एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आपला राग भारतातील निवडणूक व्यवस्थेवर काढला आहे. 'या देशातील निवडणूक प्रक्रिया अत्यंत बोगस आहे,' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या मतदानानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केले. निवडणूक आयोग आता माझं म्हणणं ऐकत असेल तर मी सांगू इच्छितो की, देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस आहे. संपूर्ण औरंगाबादमध्ये मोठ्याप्रमाणावर बोगस ओळखपत्रांच्या आधारे मतदान केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 200-200च्या गठ्‌ठ्याने ही ओळखपत्रे तयार केली जात असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय, औरंगाबाद शहरात मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचे वाटप झाल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2015 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close