S M L

यंदा मान्सून सरा'सरी'पेक्षाही कमी !

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2015 06:36 PM IST

d32no_rain_22 एप्रिल : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बळीराजा हवालदिल झालाय. आता उन्हाळा सुरू झालाय पण अवकाळी कळा काही पिच्छा सोडत नाहीये. त्यातच मान्सूनही बेभरवशाच असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

यंदा 93 टक्के मान्सून येईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या मान्सूनचा अंदाज जाहीर केला.

जून ते सप्टेंबर दरम्यान सामान्यापेक्षा पाऊस कमी राहील असाही अंदाज वर्तवण्यात येतोय. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यताही आहे. मान्सूनचं नेमकं कधी आगमन होणार याबद्दल 15 मे नंतर स्पष्ट होईल असंही हर्ष वर्धन यांनी सांगितलं. सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडण्याच्या अंदाजामुळे बळीराजा पुन्हा संकटाच्या गर्तेत सापडलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2015 06:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close