S M L

औरंगाबाद, नवी मुंबईचा आज फैसला

Samruddha Bhambure | Updated On: Apr 23, 2015 02:49 PM IST

palika election

23 एप्रिल : उन्हाचा पारा चढला असतानाही, औरंगाबाद महापालिकेसाठी 65 टक्के आणि नवी मुंबईत 51 टक्के झालेल्या मतदानाची आज (गुरुवार) मतमोजणी होत आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात होणार असून, दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दोन्ही महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, नाईक घराण्याकडची सत्ता यावेळी खेचून आणण्यासाठी युतीच्या नेत्यांनीही कंबर कसली होती. पण नवी मुंबईत काल मतदारांमध्ये मतदानासाठी फारसा उत्साह दिसला नाही. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, माजी महापौर संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, शिवसेनेचे विजय चौगुले आदी मान्यवरांनी मतदान केले. काही किरकोळ घटना वगळता नवी मुंबईत सर्वत्र शांततेत मतदान झालं.

औरंगाबाद महापालिकेसाठी सरासरी 60 ते 65 टक्के मतदान झालं. 113 जागांसाठी 904 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी व सायंकाळी मतदारांचा विशेष उत्साह होता. दुपारी उन्हामुळे केंद्रांत मतदारांची संख्या फार दिसली नाही. या ठिकाणी शिवसेना- भाजप युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम या पक्षांसह अपक्ष, बंडखोर आमनेसामने असून, कुणाचे भाग्य उजळणार हे आता मतमोजणीनंतरच कळेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2015 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close