S M L

चंद्रकांत खैरेंच्या एका डोळ्यात आसू, दुसर्‍या डोळ्यात हसू !

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2015 03:00 PM IST

chandrakant khair23 एप्रिल : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आैरंगाबाद महापालिका निवडणुकीत नेतृत्व केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महापालिकेवर भगवा फडकणार आहे. मात्र, खैरेंच्या एका डोळ्यात आसू आणि दुसर्‍या डोळ्यात हसू आले आहे. कारण, खैरे यांचा मुलगा ह्रषिकेश खैरे विजयी झाले आहे तर त्यांचा पुतण्या सचिन खैरे पराभूत झाले आहे.

ह्रषिकेश खैरे यांनी समर्थनगरमधून विजयी झाले आहे त्यांनी माजी उपमहापौर किशोर थोरात यांचा पराभव केलाय. तर दुसरीकडे खैरे यांचा पुतण्या सचिन खैरे पराभूत झाले आहे. खैरेंचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या गुलमंडीतून सचिन खैरेंना पराभवाला सामोरं जावं लागलंय.

भाजपचे बंडखोर उमेदवार राजू तनवाणी यांनी सचिन खैरे यांचा पराभव केलाय. राजू तनवाणी हे भाजपचे नेते किशनचंद तणवाणी यांचे बंधू आहेत. आपल्या पुतण्याच्या विजयासाठी खैरे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते पण, अखेरीस त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. सचिन खैरे यांच्या पराभवामुळे गुलमंडीत तणाव निर्माण झालाय. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2015 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close