S M L

नवी मुंबई : अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी सत्ता स्थापणार ?

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2015 03:26 PM IST

नवी मुंबई : अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी सत्ता स्थापणार ?

ganesh naik ncp23 एप्रिल : नवीमुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी मोर्चेबांधणी सुरू केलीये. गणेश नाईक यांनी आपला गड राखण्यासाठी 5 अपक्षांची मदत घेणार असल्याचं कळतंय.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालात राष्ट्रवादीने 51 जागांवर आघाडी मिळवलीये. बहुमतासाठी 56 जागांची गरज आहे. नाईक यांनी अपक्षांची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय.

तर दुसरीकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले आहे. पक्षाने आदेश दिले तर राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करू अशी माहिती भगत यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2015 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close