S M L

पालिका-नगरपरिषदेच्या निकालातील 10 ठळक मुद्दे

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2015 09:28 PM IST

पालिका-नगरपरिषदेच्या निकालातील 10 ठळक मुद्दे

voting_win23 एप्रिल : औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकाचे निकाल अखेर जाहीर झाला. नवी मुंबईत गणेश नाईकांनी पुन्हा गड राखला तर औरंगाबादेत सहाव्यांदा भगवा फडकणार आहे. पण, दोन्ही ठिकाणी विजय जरी मिळाला असला तरी बहुमताने मात्र, हुलकावणी दिलीये. तर दुसरीकडे, अंबरनाथ नगरपरिषद असो अथवा नांदेडमध्ये भोकर परिषदेची निवडणूक सर्वच दिग्गजांनी आपआपले गड कायम राखण्यात यश मिळवलंय. आजच्या निकालातील हे 10 ठळक मुद्दे...

1. शिवसेना-भाजप युतीने औरंगाबाद महापालिका सलग सहाव्यांदा जिंकली

2. युतीचं बहुमत थोडक्यात हुकलं, पण बंडखोरांच्या मदतीने पुन्हा सत्तेत

3. एमआयएमने औरंगाबादमध्ये मिळवल्या 25 जागा, भाजपला टाकलं मागे

4. गणेश नाईकांनी नवी मुंबई सलग पाचव्यांदा जिंकली, अपक्षांच्या मदतीने बहुमत

5. नवी मुंबईत शिवसेनेत लक्षणीय वाढ, तर भाजपचा उडाला फज्जा

6. नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी घट

7. नवी मुंबईत 6 नवरा बायको, 2 जावा, पिता-पुत्र, सासू-सून आले निवडून

8. अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांमध्ये शिवसेनेची सत्ता

9. नांदेडमधल्या भोकर नगर परिषदेवर पुन्हा अशोक चव्हाणांची सत्ता

10. राणेंना सिंधुदुर्गातही धक्का, ग्रामपंचायत निकालांत शिवसेनेची सरशी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2015 09:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close