S M L

चंद्रपूरच्या जंगलात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2015 12:53 PM IST

चंद्रपूरच्या जंगलात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला

chandrapur tigar24 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात जुनोनाच्या जंगलात वाघाचा दीड वर्षांचा बछडा मृतावस्थेत आढळलाय. या बछड्याच्या पोटाला जखमी झाल्याचं आढळलंय. त्यामुळे वाहनाच्या धडकेत हा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

जुनोना ते चिचपल्ली या रस्त्यापासून शंभर मिटर आतमध्ये वनविकास महामंडळाच्या जंगलात दीड वर्षे वय असलेली वाघाच पिल्लू आढळल्यानंतर वन विभागाच्या पथकाने भेट दिली. हा बछडा मादी असून त्याच्या पोटाला जखम आढळली. या बछड्याचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूच खरं कारण स्पष्ट होईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2015 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close