S M L

औरंगाबादेत बंडोबांचा युतीला फटका, अपक्षही जोमात

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2015 04:15 PM IST

औरंगाबादेत बंडोबांचा युतीला फटका, अपक्षही जोमात

24 एप्रिल : औरंगाबाद महापालिकेत सेना-भाजपचा भगवा फडकणार आहे. मात्र, ते म्हणावं तेवढे सोपं नाही. कारण, सेना भाजपला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. दुसरीकडे, सेना-भाजपनं परस्पर विरोधी बंडखोर पेरल्यानं दोघांनाही धोका झालाय. मात्र दोघांच्याही काही बंडखोरांना यश मिळालंय. आता, सत्ता स्थापनेसाठी बंडोबांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू झालेय.

औरंगाबाद पालिका निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेनेसह सर्वच पक्षामध्ये बंडोबांनी दंड थोपडले होते. त्याचा फटका आता युतीला बसलाय. दोघांनीही परस्पर विरोधी बंडखोरांना आर्थिक बळ दिलं. त्यातून सेनेचे जास्त 5 बंडखोर निवडणून आले आहे. तर भाजपनं पेरलेल्या बंडखोरांपैकी गुलमंडीचा केवळ एकच बंडखोर यशस्वी ठरलाय. सेना-भाजपच्या युतीच्या वेळेस ज्यांचे नगरसेवक जास्त त्यांचा महापौर हा फार्म्युला ठरला होता. आता सेनेच्या आणि भाजप यांच्यात केवळ सहा नगरसेवकांचा फरक आहे. त्यामुळे महापौरपद मिळवण्यासाठी सेना-भाजपनं अपक्ष नगरसेवक गळाला लावण्यास सुरूवात केलीय. काही अपक्षांच्या मिरवणुकांमध्ये सेना-भाजपचे नेते फिरतांना दिसत होते. सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजपचे नेते किशनचंद तनवाणी यांच्यावर नगरसेवक पळवण्याची जबाबदारी आहे. युतीच्या वेळेसही जागा वाटपावरून सेना-भाजपमध्ये रस्सीखेच झाली. आता महापौरपदाच्या दाव्यासाठी दोघांमध्ये घोडेबाजाराची स्पर्धा सुरू झालीय. या दोघांच्या भांडणात अपक्ष नगरसेवकांची मात्र चांदी होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद महानगरपालिका निकाल

शिवसेना - 29

भाजप - 23

एमआयएम - 25

काँग्रेस -10

राष्ट्रवादी काँग्रेस-3

बसप-5

आरपीआय डेमोक्रेटीक-2

अपक्ष-16

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2015 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close