S M L

महाडिकांनी 'गोकुळ'चा गड राखला

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2015 08:23 PM IST

महाडिकांनी 'गोकुळ'चा गड राखला

gokul milk4423 एप्रिल : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या सत्ताकारणामध्ये पुन्हा एकदा आमदार महादेवराव महाडिक यांनी आपलं वर्चस्व राखलंय. महाडिक गटाने 18 पैकी 16 जागा जिंकल्यात. तर विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोकुळ दूध उत्पादक संघासाठी गुरुवारी चुरशीनं विक्रमी 99 टक्के मतदान झालं होतं. सकाळपासूनच कोल्हापूरमधल्या सिंचन भवनामध्ये गोकुळच्या मतमोजणीला सुरुवात झाली. संध्याकाळी 4 वाजता संपूर्ण 18 जागांचे निकाल हाती आले असून सत्ताधारी गट म्हणजेच महाडिक यांच्या गटानं 18 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय. तर विरोधी गटाच्या म्हणजेच माजी मंत्री सतेज पाटील गटाला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. पण विशेष म्हणजे गोकुळचे विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील हे या निवडणुकीमध्ये पराभूत झालेत. निकालानंतर महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. दरम्यान निकालानंतर सतेज पाटील आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाचीही झाली. पण चोख पोेलीस बंदोबस्त असल्यानं हा तणाव काहीवेळा नंतर निवळला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2015 08:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close