S M L

औरंगाबादेत भाजपला हवंय महापौरपद, सेनेचा नकार ?

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2015 09:43 PM IST

औरंगाबादेत भाजपला हवंय महापौरपद, सेनेचा नकार ?

24 एप्रिल : औरंगाबाद महापालिकेत युतीने कसाबसा गड राखला. शिवसेना आणि भाजपमधील बंडखोरीचा युतीला फटका बसल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. आता त्यात आणखी भर पडली असून भाजपने आता महापौरपदाची मागणी केलीये. पहिले अडीच वर्ष महापौरपद द्यावं अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे केलीये. पण, सेनेनं ही मागणी फेटाळून लावलीये.

औरंगाबाद महापालिकेत सहाव्यांदा भगवा फडकणार आहे. शिवसेनेनं 29 जागा जिंकल्या आहे तर भाजपने 23 जागा पटकावल्या आहेत. युतीच्या वाटायला एकूण 52 जागा आल्यात त्यामुळे बहुमताने हुलकावणी दिलीये. मात्र, बंडखोरांना सोबत घेऊन सत्तास्थापनेसाठी युतीने तयारी सुरू केलीये. त्यामुळे युतीची सत्ता येणार हे निश्चित आहे. आज सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरी युतीची बैठक झाली. या बैठकीत भाजपने आता महापौरपदाची मागणी केल्यामुळे तणाव वाढलाय. पहिले अडीच वर्ष भाजपचा तर दुसरी अडीच वर्ष शिवसेनेचा महापौर असावा असा प्रस्ताव भाजप नेत्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.मात्र, शिवसेनेनं हा प्रस्ताव अमान्य केलाय. 5 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असा फॉर्म्युला ठरला होता त्यावर शिवसेना ठाम आहे. उद्या, सेनेचे सर्व विजयी उमेदवार मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येणार आहे. त्यामुळे यावादाचा मातोश्रीवर तोडगा निघतो का हे पाहण्याचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2015 09:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close