S M L

नेपाळमध्ये 125 भारतीय अडकले

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2015 08:00 PM IST

earthquake_nepal (20)25 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयकारी भूकंपात भारतील 125 नागरीक अडकल्याची माहिती समोर आलीये. वेगवेगळ्या टूर्सद्वारे भारतीय पर्यटक काठमांडूमध्ये पर्यटनासाठी पोहचले. या सर्व 125 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

नेपाळमध्ये महाराष्ट्र राज्यातील 28 पर्यटक केसरी टूर्सकडून गेले आहे. भूकंप झाला त्याठिकाणी हे पर्यटक नव्हते. त्यामुळे सगळे सुखरूप आहेत. नेपाळमधे विमानसेवा सुरू होताच त्या सगळया पर्यटकांना महाराष्ट्र आणले जाईल असं केसरी टूर्सचे चेअरमन केसरी पाटील यांनी सांगितलं. तर नाशिकमधले 13 कुटुंब नेपाळला गेलेत. ते सर्व सुखरूप आहेत. तसंच नागपुरातील पाच ग्रुप नेपाळ मधे अडकले, यात एकूण 240 लोक आहेत, सर्व लोकांशी संपर्क झाला आहे, सर्व जण सुरक्षित आहेत अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2015 08:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close