S M L

वांद्रे स्टेशनवर पादचारी पुलाला लागलेली आग आटोक्यात

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2015 09:59 PM IST

वांद्रे स्टेशनवर पादचारी पुलाला लागलेली आग आटोक्यात

bandra 4425 एप्रिल : मुंबईतील वांद्रे लोकल स्टेशनवर पादचारी पुलाला लागलेली आग आटोक्यात आलीये. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या मागील बाजूस असलेल्या पादचारी पुलाला ही आग लागली होती. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे आग झोपडपट्टीतही पसरली होती. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

आग विझवण्यासाठी 12 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात होत्या. खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 अंधेरीकडे जाणारी लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. ही आग स्टेशनच्या बाजूला असलेल्या शास्त्रीनगरमधील झोपड्या भक्षस्थानी पडल्या आहे.

नेमकी ही आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. आग लागल्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. त्यामुळे अंधेरीकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2015 09:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close