S M L

सिद्धीविनायक मंदिरातील दागिन्यांचा लिलाव

17 ऑक्टोबर मुंबईतल्या सिद्धीविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा शनिवारी लिलाव होणार आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यास समितीनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर गणेशभक्तांना बाप्पाच्या दागिन्यांचा प्रसाद मिळणार आहे. मुंबईतलं सिद्धीविनायकाचं मंदिर गणेश भक्तांचं आशास्थान आहे. दागिन्यांच्या लिलावातून मिळणार्‍या पैशातून, न्यास समिती समाजोपयोगी कामं करणार असल्याचं सिद्धिविनायक न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हनुमंत जगताप यांनी सांगीतलं. मुंबईतल्या लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा ज्याप्रमाणे लीलाव करण्यात येतो. त्याप्रमाणे आता या दिवाळी पासुन सिद्धीविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचाही लिलाव होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सिद्धिविनायकाला अर्पण केलेले दागिने तसेच पडून होते. आता त्यांचा लिलाव करुन मिळणार्‍या पैशातून समाजपयोगी कामं केली जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2009 09:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2009 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close