S M L

देवभूमी हादरली, हजारो बळी

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2015 09:45 PM IST

देवभूमी हादरली, हजारो बळी

 25 एप्रिल :  नेपाळमधील भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि जीवीतहानी झालीये. मृतांचा आकडा एक हजारांच्यावर पोहोचलाय. पण ही जीवीतहानी वाढण्याची शक्यताही वर्तवली जातेय.

देवभूमी नेपाळमध्ये आज भूकंपानं तांडव केलं. जिथे नजर जाईल तिथे आज मोठ्या प्रमाणावर हानी झाली. जिथे एकेकाळी इमारती होत्या..तिथे आज ढिगारे जमले. पक्के रस्ते खचलेत..रस्त्यांना मोठ मोठ्या भेगा गेल्यात.. ही दृष्यच आज नेपाळमधील विध्वंस सांगून जातायत...

या भूकंपाचं केंद्रस्थान काठमांडूपासून जवळपास 80 किलोमीटरवर असलेल्या लमजुंग हे होतं. सकाळी 11 वाजून 41 मिनिटांनी 7.9 रिश्टर स्केल इतका मोठा धक्का जवळपास एक मिनीटभर नेपाळला हादरवून गेला आणि या झटक्यानंच सर्वात जास्त नुकसान केलं.

हा धक्का इतका मोठा होता की, 1832 ला बनवलेला ऐतिहासिक धरहरा मनोरा जमिनदोस्त झालाय. ज्यावेळी भूकंप आला त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकही होते. जुन्या काठमांडूतील हनमनढोका भागातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. भूकंपाचं

केंद्रस्थान असलेल्या लामजुंग आणि आसपासच्या भागातील टेलिफोन सेवा अनेक काळ ठप्प झाली होती.

इतकंच नाही तर नेपाळमधील प्रसिद्ध जनकपूर मंदिराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भूकंपाची तीव्रता इतकी मोठी होती की काठमांडू विमानतळाचंही नुकसान झालंय. त्यामुळे विमानतळ काही वेळासाठी बंद केलं गेलं होतं. काठमांडूच्या मोबाईल सेवेवरही या भूकंपाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालाय. पण, या पहिल्या भूकंपानंतर बसला तो दुसरा धक्का..पोखरा या गावात या भूकंपाचं केंद्रस्थान होतं आणि याची तीव्रता होती 6.6 रिश्टर स्केल.

संबंधीत बातम्या

 नेपाळला भूकंपाचा हादरा, उत्तरभारत दिल्लीही हादरली

 पाहा हे भूकंपानंतरचे फोटो

 काठमांडूमध्ये वीना टूर्सचे महाराष्ट्रातील 28 पर्यटक सुखरूप

 भुकंपामुळे बिहारमध्ये 22 जणांचा मृत्यू

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2015 09:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close