S M L

नेपाळमध्ये पुन्हा भूकंप, दिल्लीही हादरली

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2015 01:47 PM IST

earthquake_nepal (8)26 एप्रिल : शनिवारी महाप्रलयकारी भूकंपानंतर आज पुन्हा एकदा नेपाळला भूकंपाचा हादरला बसलाय. भूकंपाचं केंद्रबिंदू हे नेपाळमध्येच असून 6.9 रिश्टर इतक्या क्षमतेचा हा भूकंप होता. या भूकंपामुळे भारताची राजधानी दिल्लीही हादरलीये. या धक्क्यामुळे दिल्लीची मेट्रो थांबवण्यात आलीये. आज दुपारी 12 वाजून 42 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. 10 ते 15 सेंकद धक्के जाणवले. दिल्ली पाठोपाठ गुवाहटीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप आल्यानंतरचे हे धक्के असतात असं तज्ज्ञांनी सांगितलं. आणखीही काही दिवस भूकंपानंतरचे हे धक्के जाणवणार असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

नेपाळ आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. आज दुपारी आलेला भूकंप जोरदार होता. या धक्क्यामुळे नेपाळमधील पंतप्रधान कार्यालयाच्या इमारतीला तडे गेले. त्यावेळी कार्यालयात बैठक सुरू होती तेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये गेल्या 24 तासात 26 धक्के जाणवले आहे. दिल्लीसह चंदिगढमध्येही सौम्य धक्के जाणवले. भूकंपामुळे नागरीक भयभीत झाले. विशेष म्हणजे शनिवारी उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसले होते. आणि आज पुन्हा एकदा धक्के जाणवले. देशभरात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात आतापर्यंत 2 हजार लोकांचा बळी गेलाय. तर 4 हजार 700 लोक जखमी झाले आहे. हजारो लोकं बेघर झाले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2015 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close