S M L

मडगाव स्फोटामागे सनातन संस्थेचा हात असल्याचा संशय

17 ऑक्टोबर गोव्यातल्या मडगावमध्ये झालेल्या स्फोटात सनातन संस्थेचा हात असल्याचा संशय गोव्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केला आहे. गुप्तचर विभागातल्या सूत्रांनी या हल्ल्यात हिंदू जनजागरण समितीचा हात असल्याचं म्हटलं आहे. त्यात सनातन संस्थेचे सदस्यही असू शकतात, असं सूत्रांचं म्हणणं आहे. याप्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान गोवा सरकारने राज्यात रेड ऍलर्ट जारी केलं आहे. शुक्रवारी रात्री गोव्यातल्या मडगावमध्ये स्कूटरच्या डिकीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात एकजण ठार, तर दोनजण जखमी झालेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मडगावमधल्या मध्यवर्ती भागात असलेल्या ग्रेस चर्चजवळ हा स्फोट झाला होता. या स्फोटात वापरण्यात आलेली स्कूटर सनातन संस्थेच्या निशाद बाकले या कार्यकर्त्याची असल्याचं समजतं. गृहमंत्री रवी नायक आणि गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घटनास्थळाला भेट दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2009 11:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2009 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close