S M L

नवी मुंबईत अखेर आघाडी, राष्ट्रवादीचा महापौर !

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2015 10:45 PM IST

नवी मुंबईत अखेर आघाडी, राष्ट्रवादीचा महापौर !

27 एप्रिल : नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी आपला गड राखला. पण, बहुमताने हुलकावणी दिल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला. अखेरीस राष्ट्रवादीचा मित्रपक्ष काँग्रेसने हात पुढे केलाय. नवी मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केलीये अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलीये. काँग्रेसनेही यावर शिक्कामोर्तब केलंय.

नवी मुंबई महापालिकेच्या आखाड्यात गणेश नाईकच किंग ठरले. नाईक यांनी स्वबळावर किल्ला लढवत राष्ट्रवादीला 52 जागा मिळवून दिल्यात. पण बहुमताचा 56 चा जादूई आकडा गाठण्यात अपयश आलंय. नाईक यांनी अपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला. पण, आता मित्रपक्ष काँग्रेसनेच साथ दिल्यामुळे महापौरपदाचा मार्ग मोकळा झालाय. काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आम्ही राष्ट्रवादीसोबतच जाणार असं स्पष्ट केलंय. या आघाडीमुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर असणार आहे अशी घोषणा सुनील तटकरे यांनी केलीये. राष्ट्रवादीच्या 12 जागा, काँग्रेस 10 आणि अपक्ष 4 जागा अशा मिळून 66 इतक संख्याबळ आघाडीचं झालंय. त्यामुळे राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झालाय. तर दुसरीकडे शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाल सुरू केली होती. युतीने अपक्षांसह काँग्रेसला सोबत घेऊन महापौरपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. पण, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला मदत करणार नाही असं स्पष्ट करून सेनेच्या मदतीवर पाणी फेरलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2015 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close