S M L

औरंगाबाद महापौरपदाचा तिढा अखेर सुटला

Samruddha Bhambure | Updated On: Apr 28, 2015 01:26 PM IST

aurangabad

28 एप्रिल :औरंगाबादमधील महापौरपदासाठीचा युतीमधला तिढा अखेर सुटला आहे. औरंगाबाद महापालिकेतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीचा नवीन फॉर्म्युला पुढे आला आहे. नव्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेकडे चार वर्ष महापौरपद तर भाजपकडे एक वर्ष महापौरपद देण्यात येणार आहे.

यामध्ये पहिले दीड वर्ष सेनेकडे महापौरपद राहील आणि त्यानंतर पुढचा एक वर्ष महापौरपद भाजपकडे जाईल आणि त्यानंतर अडीच वर्ष पुन्हा शिवसेनेकडे हे महापौरपद असेल.

काल (सोमवा) रात्री उशिरा मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2015 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close