S M L

राहुल गांधी शेतकर्‍यांच्या भेटीला, 30 एप्रिलपासून विदर्भ दौर्‍यावर

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2015 10:02 PM IST

Rahul-Gandhi baneruehu28 एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उद्या (बुधवारी) महाराष्ट्रात येतायत. दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त भागाचा राहुल गांधी 30 एप्रिलला दौरा करणार आहे.

विदर्भाच्या दौर्‍यात राहुल गांधी जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. यामध्ये काही भागात ते पदयात्रा काढतील आणि काही भागांना गाडीने भेट देतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. राहुल गांधी या दौर्‍यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना भेट देतील. राज्यात 1200हून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. त्यामुळे हे सरकार झोपेचं ढोंग करणारं आहे, असा आरोपही काँग्रेसने केलाय. भूसंपादन विधेयकाबाबतच्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा आहे. राज्याने दिलेल्या माहितीवर केंद्राचा विश्वास नाहीय, असा दावाही काँग्रेसने केलाय. विशेष म्हणजे, आज राहुल गांधींनी दोन महिन्यांच्या सुट्टीवरुन परतल्यानंतर भूसंपादन विधेयकावर आक्रमक भूमिका घेतलीये. सर्वात पहिले त्यांनी शेतकर्‍यांची भेट घेतली होती. तसंच लोकसभेतही त्यांनी भूसंपादन विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल करत शेतकर्‍यांची बाजू घेतली होती. आता राहुल गांधी शेतकर्‍यांचा भेटीला निघाले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2015 10:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close