S M L

राहुल गांधींच्या दौर्‍यावर राणेंचा बहिष्कार ?

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2015 11:54 PM IST

rane_meet_rahul28 एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 30 एप्रिलपासून विदर्भाच्या दौर्‍यावर येणार आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी या दौर्‍यावर बहिष्कार टाकलाय. नारायण राणे राहुल गांधींच्या विदर्भ दौर्‍यात सामील होणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिलीये. काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दौर्‍यात सामील होणार आहे. पण राणे या दौर्‍याकडे पाठ फिरवणार आहे.

विदर्भाच्या दौर्‍यात राहुल गांधी जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. यामध्ये काही भागात ते पदयात्रा काढतील आणि काही भागांना गाडीने भेट देतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. राहुल गांधी या दौर्‍यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना भेट देतील. अमरावतीतून देशव्यापी या पदयात्रेला राहुल गांधी सुरूवात करणार आहे. यावेळी राज्यातील आणि देशातील प्रमुख नेते उपस्थित असणार आहे. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पक्षाला घरचा अहेर देण्याचा ठरवलंय. नारायण राणे या दौर्‍यात सामील होणार नाही असं सूत्रांकडून कळतंय. मात्र, राणे यांनी अजून अधिकृतपणे भूमिका जाहीर केली नाही. काँग्रेसनेही यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2015 11:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close