S M L

दूध विक्रेत्यांची मुजोरी, राज्यात 1 मेपासून 5 कंपन्यांच्या दूध विक्री बंद

Samruddha Bhambure | Updated On: Apr 29, 2015 10:02 AM IST

दूध विक्रेत्यांची मुजोरी, राज्यात 1 मेपासून 5 कंपन्यांच्या दूध विक्री बंद

29  एप्रिल : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अमूल, गोकुळ, महानंद, मदर डेअरी, वारणा या पाच नामांकित कंपन्यांच्या दुधाची विक्रीवर येत्या 1 मेपासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाचे अध्यक्ष अमर दळवी यांनी याबाबतची महिती दिली आहे. तसंच दूध विक्रेत्यांनी या पाच कंपन्यांचे दूध विकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

या कंपन्यांकडून विक्रेत्यांना एका लिटरमागे छापील किमतीच्या फक्त अडीच ते तीन टक्के इतके कमिशन दिले जाते. ते वाढवून मिळावे, अशी विक्रेत्यांची मागणी आहे. कुलिग चार्चेसच्या नावाखाली दुधविक्रेते ग्राहकांची लूट करत असल्याची तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने या नफेखोर दुधविक्रेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. त्यावर या मुजोर दुध विक्रेत्यांनी थेट दुध विक्रीवरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2015 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close