S M L

औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे

Samruddha Bhambure | Updated On: Apr 29, 2015 01:23 PM IST

औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे

29  एप्रिल : औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदी आज (बुधवारी) शिवसेनेचे नगरसेवक त्र्यंबक तुपे यांची निवड झाली. 71 नगरसेवकांनी त्यांच्या पारड्यात मत टाकले. तुपे यांनी एमआयएमचे महापौरपदाचे उमेदवार गंगाधर ढगे यांचा पराभव केला. ढगे यांना 26 मते पडली.

महापौरपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. पण अखेर दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या वाटाघाटींनुसार औरंगाबादचे महापौरपद चार वर्षे शिवसेनेकडे आणि एक वर्ष भाजपकडे राहणार आहे. म्हणजे पहिली दीड वर्ष शिवसेनेचा महापौर असेल त्यानंतर एक वर्ष महापौरपद भाजपकडे असेल आणि उरलेले अडीच वर्षे पुन्हा शिवसेनेचा महापौर होईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत हा प्रस्ताव मान्य झाला आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेना, भाजपच्या बंडखोर उमेदवारांनीही युतीलाच आपला पाठिंबा जाहीर केला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2015 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close