S M L

राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर

Samruddha Bhambure | Updated On: Apr 29, 2015 12:09 PM IST

Image rahul_gandhi_in_satara_2_300x255.jpg29  एप्रिल :  शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर येत आहेत. ते आज (बुधवारी) रात्री नागपूरमध्ये दाखल होतील. त्यानंतर ते उद्या (गुरुवारी) सकाळी अमरावती जिल्ह्यात शेतीची पाहणी करण्यासाठी रवाना होणार आहेत.राहुल गांधी यांचा एकूण दौरा 150 किमीचा असेल, त्यातील 15 किमी ते पदयात्रा करणार आहेत आणि उर्वरित दौरा कारने करणार असल्याची माहिती आहे.

दोन महिन्यांच्या सुट्टीवरुन परतल्यानंतर राहुल गांधींनी मोदी सरकारच्या भूसंपादन विधायकाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. राहुल गांधी अमरावतीतून देशव्यापी पदयात्रेला सुरूवात करणार आहे. या दौर्‍यात राहुल गांधी सर्वात आधी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी राज्यातील आणि देशातील प्रमुख नेते उपस्थित असणार आहे. मात्र, नारायण राणे या दौर्‍यात सामील होणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, राणे यांनी अजून अधिकृतपणे भूमिका जाहीर केली नाही. काँग्रेसनेही यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2015 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close