S M L

लंडनमधील बाबासाहेबांचं घर सरकारच्या ताब्यात

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2015 07:31 PM IST

babasaheb_home29 एप्रिल : लंडनमध्ये वास्तव्यास असलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं घर खरेदी करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. महामानवाचं महास्मारक आता भारताच्या ताब्यात आलंय. या स्मारकासाठी राज्य सरकाने अंदाजे 40 कोटी खर्चून हे ऐतिहासिक घरं खरेदी केलंय.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्वल उके यांनी खास लंडनमध्ये ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. लंडनमधलं बाबासाहेबांचं घर खरेदी करून बडोले आजच मुंबईत परतले आहे. अंदाजे 40 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र सरकारने हे ऐतिहासिक घर खरेदी केलंय. बाबासाहेबांच्या या लंडनमधल्या घराला यापूर्वीच राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2015 07:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close