S M L

चोराचा कहर, चक्क केळीची बागच नेली कापून !

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2015 08:05 PM IST

चोराचा कहर, चक्क केळीची बागच नेली कापून !

jalgaon chori29 एप्रिल : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही अशीच एक चोरीचा घटना जळगावमध्ये घडली असून चोराने चक्क केळीची बागच कापून नेली आहे.

चोपडा तालुक्यात एका माथेफिरू चोराने चक्क अख्खी केळीची बागच कापून नेलीय. खडगावातले शेतकरी सदाशिव पाटील यांच्याबाबतीत हा दूदैर्वी प्रकार घडलाय. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातरी तब्बल 3 हजार झाडं कापून जमीनदोस्त केलीत. गेल्या तीन महिन्यातली ही सलग तिसरी घटना आहे. या नासाडीबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारही दिलीय. पण पोलीस या माथेफिरू चोरट्याला अजूनही पकडू शकलेले नाहीत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2015 08:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close