S M L

राज्यातील वाहतुकदारांचा संप मागे

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2015 12:23 PM IST

राज्यातील वाहतुकदारांचा संप मागे

#chakkajam

30  एप्रिल : केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ते वाहतूक सुरक्षा कायद्याविरोधात 'नॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स'ने पुकारलेला बंद अखेर मागे घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन कायदा राज्यात लागू करणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर संघटनांनी संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

देशभरात आज वाहतूक संघटनांनी एक दिवसांचा संप पुकारला असून राज्यातही या संपाचे पडसाद दिसत होते. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात या संपाला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी राज्यातील ग्रामीण भागांमध्ये एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत होते.

याप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज (गुरुवारी) सकाळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांच्या निवासस्थानी राज्यभरातील वाहतूकदार संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, बेस्ट आणि एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत रावतेंनी हा नवीन कायदा लागू करणार नसल्याचं तसंच एसटीचे खासगीकरण करणार नसल्याचं आश्वासनही दिलं आहे. रावतेंच्या आश्वासनानंतर राज्यभरातील वाहूतदार संघटनांनी संप मागे घेतल्याचे घोषणा केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2015 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close