S M L

स्वसंसेवी संस्थांचे परवाने रद्द, अमेरिकेनं मागितलं स्पष्टीकरण

Sachin Salve | Updated On: May 1, 2015 07:13 PM IST

rajnatha_and_modi01 मे : भारत सरकारनं परदेशातून निधी मिळणार्‍या तब्बल 9 हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे अमेरिकेनं भारत सरकारकडून स्पष्टीकरण मागितलंय.

केंद्र सरकारनं परवाने रद्द केलेल्या संस्थांमध्ये ग्रीनपीस इंडिया या स्वयंसेवी संस्थेचाही समावेश आहे. शिवाय फोर्ड फाऊंडेशनवरही नजर ठेवली जातेय. परदेशी निधी नियामक कायद्याचा भंग केल्याचा आरोप या संस्थांवर ठेवण्यात आलाय. या आठवड्याच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारनं तब्बल 9 हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द केले आहे. दरम्यान, तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला निधी पुरवणार्‍या फोर्ड फाऊंडेशनवर केंद्रानं कारवाई केली होती. त्याबद्दल अमेरिकेच्या गृहमंत्रालयानं गेल्या आठवड्यातच नाराजी व्यक्त केली होती आणि आता भारत सरकारकडून स्पष्टीकरण मागवलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2015 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close