S M L

विधानसभेची मतमोजणी तयारी पूर्ण

21 ऑक्टोबर राज्यातील गुरुवारी होणार्‍या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतली पाच मतमोजणी केंद्रं संवेदनशील जाहीर करण्यत आली आहेत, तर 13 उमेदवारांना वैयक्तिक संरक्षण देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ठिकठिकाणी सुरक्षाव्यवस्था अगदी कडक करण्यात आली आहे. कोल्हापुरातही मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 73.91% मतदान झालं होतं. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदारसंघनिहाय मतमोजणी स्थळावर महत्त्वाच्या रूममध्ये इव्हीएम मशिन्स लावण्यात आल्या आहेत. त्याभोवती कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येणार आहे तर मतमोजणीसाठी नाशिकमध्येही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुरुवारच्या मतमोजणीसाठी सुरक्षेची सगळी तयारी झाल्याचं पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2009 12:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2009 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close