S M L

युतीत मानापमानाचं नाट्य, कदमांचा कार्यक्रमातून काढता पाय !

Sachin Salve | Updated On: May 1, 2015 11:27 PM IST

युतीत मानापमानाचं नाट्य, कदमांचा कार्यक्रमातून काढता पाय !

01 मे : औरंगाबादेत एका सरकारी कार्यक्रमात शिवसेनेचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली नसल्याचा अनूभव आला. त्यामुळं औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदारांनी उद्घाटन कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

औरंगाबादेत आज जीवन प्राधिकारणाच्या इमारतीचं उद्घाटन होतं. वास्तविक पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांचं नाव आणि फोटो कार्यक्रमाच्या स्टेजवर असायला हवा होता. रामदास कदम यांनी उद्घाटन केलं आणि स्टेजवर गेले. मात्र, त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बबनराव लोणीकर यांचेच फोटो दिसले. त्यांचा फोटो किंवा नावही नव्हतं. त्यामुळं रामदास कदम स्टेजवर चढले आणि लगेच बाहेर पडले. त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी दिसत होती. खासदार चंद्रकांत खैरे आणि सेनेचे सर्व आमदारही रामदास कदम यांच्या पाठोपाठ बाहेर पडले.या प्रकरणी पालकमंत्री आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली. जर हा भाजपचा कार्यक्रम होता तर आम्हाला बोलवलेच कशाला? अशी संतप्त प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली. भाजपने कार्यक्रम घ्यावा याबद्दल आम्हाला अडचण नाही पण युतीत एकत्र आहोत याचं तरी भान बाळगावं असा सल्लाही कदम यांनी दिला. तर, कार्यक्रमात जे घडले ते चुकीचे होते. भाजपच्या नेत्यांनी मान-सन्मान ठेवायला पाहिजे अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2015 11:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close