S M L

'त्याला' व्हॉट्सअॅप, फेसबुक माहित नाही, पण पठ्‌ठ्या जेईईत पहिला आला !

Sachin Salve | Updated On: May 2, 2015 07:24 PM IST

'त्याला' व्हॉट्सअॅप, फेसबुक माहित नाही, पण पठ्‌ठ्या जेईईत पहिला आला !

ashish gavai302 मे : आयआयटी प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची समजली जाणारी जेईई या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याच्या अत्यंत ग्रामीण भागात राहणारा आणि सामान्य परिवारातून आलेल्या आशिष गवई याने देशात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आशिषने संपूर्ण शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. त्याच्या भरारीमुळे तो ग्रामीण भागातील तरुणांसाठी ब्रँड आयकॉन ठरलाय. त्याच्या या यशाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, देवयानी खोब्रागडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे

ज्याने तीन वर्षांत कधीही टिव्ही पाहिला नाही ज्याला व्हॉटस्‌ऍप अन् फेसबुक चा अजिबात गंध नाही. त्याला माहित आहेत त्याच्या अभ्यासाचे जाड जाड पुस्तकं अन् संदर्भ ग्रंथ...अन् पुस्तकांचा साज वाचनालयच ज्याचे जीवन असा तो आशिष गवई...वडिल जिल्हा परिषद शाळेवर प्राथमिक शिक्षक त्यामुळे बालपण साखरखेडा या ग्रामीण परिसरात आणि शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. पुढे अकरावीत विज्ञानमध्ये शाहूमध्ये पूर्ण झालं.

आशिषच्या यशाची भरारी दोन वर्षांपूर्वीपासून सुरूच आहे. के व्ही पी वाय 2013 स्पर्धेत तो भारतातून तिसरा आला. तसंच पुष्पेंदू कुमार दास यांनी त्याला ज्युनियर वैद्न्यानिक पदासाठी 89,300 प्रती महा रुपयाचे पॅकेज ऑफर केले आहे. 2014 महिन्यात रिजनल गणिताच्या ऑलिपियाड स्पर्धेत तो भारतातून पहिला येण्याचा मान ही त्याने पटकाविला होता. अत्यंत मानाचा मानला जाणारा ब्राम्होत्स या अमेरिका सरकारच्या स्पर्धेत पाच लेव्हलपर्यंत क्वालिफाय झाल्याने त्याला न्यूयार्क येथील युक्रोन येथील एआयटीसाठी तेथील कॉलेजसाठी

निवडही झाली आहे. तो त्या कॉलेजमध्ये देखील कधिही जावू शकतो.

दिवस रात्र केवळ अभ्यास अन् अभ्यास...केवळ तीन तास झोप आणि अभ्यासात पूर्ण पणे स्वतःला झोकून दिलेला आशिष समोर ज्युनिय साइण्टिस्टचे भरपूर पॅकेज आणि न्युयॉर्कच्या कॉलेजची अशा अनेक ऑफर आहेत. पण त्याला आयआयटीमध्ये करिअर करायचे आहे त्यासाठी त्याने मेकॉनिकलमध्ये प्रवेश घ्यावा असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्यक्ष फोन करून दिला. आशिषला कॉम्प्युटरमध्ये आयआयटीला प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला आयएएस होवून मोठा अधिकारी व्हायाचे आहे. त्याच्या आईचे देखिल हेच स्वप्न आहे आपला मुलगा कलेक्टर बनावा.

मागास समाजाचा मुलगा आणिु साखरखेड्या सारख्या ग्रामीण भागात शिकलेला आशिष ज्याने देश पातळीवर आपला आणि आपल्या परिवाराचा, गावाचा, जिल्ह्याचा तुरा रोवला. असा हा आशिष ग्रामीण भागातील होतकरू युवकांसाठी ब्रँड आयकॉन ठरलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2015 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close