S M L

प्रिन्स विल्यम आणि केट यांना कन्यारत्न

Sachin Salve | Updated On: May 2, 2015 07:18 PM IST

प्रिन्स विल्यम आणि केट यांना कन्यारत्न

02 मे : इंग्लंडच्या राजघराण्यात एका नव्या पाहुणीचं आगमन झालंय. डचेस ऑफ कॅम्ब्रिज म्हणजेच इंग्लंडची युवराज्ञी केट मिडलटन हिनं एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांचं हे दुसरं मूल आहे. लंडनमधल्या सेंट मेरी या हॉस्पिटलमध्ये तिनं मुलीला जन्म दिला. जुलै 2013 मध्ये प्रिन्स जॉर्जचा जन्मसुद्धा याच हॉस्पिटलमध्ये झाला होता. राजघराण्यात या नव्या पाहुणीच्या आगमनाने लंडनमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विल्यम आणि केटला शुभेच्छा देण्यासाठी सेंट मेरी हॉस्पिटलबाहेर नागरिकांनी गर्दी केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2015 07:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close