S M L

एर्नाकुलम्‌ दुरांतो एक्स्प्रेसचे 10 डबे घसरले; वाहतूक विस्कळीत

Samruddha Bhambure | Updated On: May 3, 2015 12:52 PM IST

एर्नाकुलम्‌ दुरांतो एक्स्प्रेसचे 10 डबे घसरले; वाहतूक विस्कळीत

03 मे : लोकमान्य टिळक टर्मिनस एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेसचे 10 डबे घसरल्याची घटना रविवारी सकाळी घडली. कोकण रेल्वे मार्गावर मडगावच्या बालीजवळ आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुट्टीत कोकणात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या हालात भर पडली आहे.

रेल्वे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या मार्गावर धावणार्‍या अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक फिसकटले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2015 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close