S M L

उन्हाचा चढला ‘पारा’, तापमानानं गाठली चाळीशी

Samruddha Bhambure | Updated On: May 3, 2015 08:10 PM IST

उन्हाचा चढला ‘पारा’, तापमानानं गाठली चाळीशी

03 मे : मे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले आहेत. मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. आर्द्रताही वाढल्यामुळे उकाडयानेही मुंबईकरांची तगमग सुरू आहे. राज्यात पारा 40अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग उन्हामुळे होरपळून निघत आहे.नागपूर, वर्ध्यामध्ये 44 तर पुणे नाशिकमध्येही पारा 40 च्या वर पोहोचला आहे.

मागच्या चार-पाच दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. परिणामी, सकाळी नऊ वाजल्यापासूनच शहरात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. चटका बसवणार्‍या कडक उन्हामुळे लोक अक्षरश: भाजून निघत असल्याने दुपारी रस्त्यावरही तुरळक गर्दी दिसून येत आहे. उन्हामुळे होणार्‍या काहिलीपासून सुटका मिळवण्यासाठी लोकांनी रसवंती गृह, आईस्क्रीम पार्लर, कलिंगड आणि फळ विक्रेत्यांकडे धाव घेतली आहे.

तापमानानं गाठली चाळीशी

मुंबई- 35 अंश सेल्सियस

पुणे - 40 अंश सेल्सियस

नाशिक - 40 अंश सेल्सियस

नागपूर - 44अंश सेल्सियस

वर्धा - 44 अंश सेल्सियस

अकोला - 43अंश सेल्सियस

यवतमाळ - 39 अंश सेल्सियस

सोलापूर - 42 अंश सेल्सियस

औरंगाबाद - 41 अंश सेल्सियस

परभणी - 41अंश सेल्सियस

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2015 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close