S M L

पवईत IIT कॅम्पसमधील विद्यार्थ्याची विष पिऊन आत्महत्या

Samruddha Bhambure | Updated On: May 3, 2015 02:51 PM IST

पवईत IIT कॅम्पसमधील विद्यार्थ्याची विष पिऊन आत्महत्या

03 मे : पवईतील  IIT कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी ही घटना घडली.

रितेश शर्मा असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो केमिकल इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षाचा विद्यार्थी होता. रितेशने हॉस्टेल 15 मध्ये विष पिऊन जीवन संपवलं. मित्र बाहेर गेले असताना रितेश रूममध्ये एकटाच होता. त्याचवेळी त्याने विष प्राशन केलं.

दरम्यान, आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट असून पवई पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2015 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close