S M L

लख्वीप्रकरणात भारताला संयुक्त राष्ट्राची साथ

Samruddha Bhambure | Updated On: May 3, 2015 06:38 PM IST

lakhvi-1

03 मे : 26/11 बॉम्बस्फोटाचा मास्टर माईंड आणि लष्कर कमांडर झकी उर रहमान लख्वीला पाकिस्तान न्यायालयाने सुटका दिल्याप्रकरणी भारताने याविरोधात संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करावी अशी मागणी केली होती. त्या मागणीवर संयुक्त राष्ट्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिषदेच्या पुढील बैठकीत लख्वीच्या मुद्यावर विचार केला जाईल, असं आश्वासन संयुक्त राष्ट्राने दिलं आहे.

यूएनमध्ये भारताचे प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी लख्वी प्रकरणी यूएन निर्बंध समितीचे अध्यक्ष जीम मॅक्ले यांना एक पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तान न्यायालयाने लख्वीची सुटका करून जागतिक संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे, असं मुखर्जी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे यूएनने हा विषय पाकिस्तानकडे लावून धरावा, अशी मागणी भारतातर्फे केली. या शिवाय अतिरेकी ठरवलेल्या व्यक्तीची संपत्ती सील करण्याचा नियम आहे, मग लख्वीने जामिनासाठी पैसे कुठून आणले, असा सवाल भारतानं विचारला आहे. त्यावर पुढच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्याचं आश्वासन यूएनच्या सुरक्षा समितीने दिले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2015 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close