S M L

अमेरिकेचा मेवेदर ठरला ‘बॉक्सिंग किंग’

Samruddha Bhambure | Updated On: May 3, 2015 04:35 PM IST

अमेरिकेचा मेवेदर ठरला ‘बॉक्सिंग किंग’

अवघ्या जगाचे लक्ष ज्या लढतीकडे लागले होते त्या 'फाईट ऑफ द सेंच्युरी' अर्थात बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात अमेरिकेचा फ्लॉईड मेवेदर विजयी ठरला आहे. मेवेदरने 350 विरुद्ध 334 गुणांनी सामना जिंकत फिलीपिन्सच्या मॅनी पॅकियाओचा पराभव केला. या विजयामुळे मेवेदरने सहा कोटी रुपयांचा बेल्ट आणि 950 कोटी रुपयांच्या पारितोषिकावर नाव कोरले आहे.

लास वेगासच्या एमजीएम ग्रँड मरिना इथे बॉक्सिंगमधील 67 किलो वजनीगटासाठी महामुकाबला रंगला. अमेरिकेचा 38 वर्षी बॉक्सिंगपटू मेवेदर विरुद्ध फिलिपीन्सचा मॅनी पॅकियाओ यांच्यात हा महामुकाबला रंगला. या सामन्यासाठी सुमारे 400 मिलीयन डॉलर्सचे पारितोषिक होते.

हा ऐतिहासिक महामुकाबला बघण्यासाठी 17 हजार प्रेक्षक उपस्थित होते. 36 मिनीटं आणि 12 राऊंड मध्ये रंगलेल्या या महामुकाबल्यात सुरुवातीला पॅकियाओने मेवेदरला चांगलीच लढत दिली. मात्र शेवटच्या काही फेर्‍यांमध्ये मेवेदरने सर्वोत्तम खेळी करत पॅकियाओला धूळ चारली. सामना गमावूनही पॅकियाओला 636 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले. मेवेदर हा बॉक्सिंगमधील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला असून त्यांची संपत्ती आता 27 अब्ज रुपये ऐवढी झाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2015 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close