S M L

मुंबई पालिका निवडणुकीआधी युती तुटेल, शरद पवारांचं भाकीत

Samruddha Bhambure | Updated On: May 4, 2015 09:53 PM IST

मुंबई पालिका निवडणुकीआधी युती तुटेल, शरद पवारांचं भाकीत

04 मे : औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने एकत्र लढत विजय मिळवला. मात्र,'शिवसेना भाजपची युती मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगोदर संपुष्टात येईल' अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवारी) औरंगाबादमध्ये केली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी शेती, कर्जमाफी, वेगळ्या विदर्भासह विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषणने गौरवल्यामुळे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेला विरोध हा वैयक्तिक असून त्याच्याशी राष्ट्रवादी पक्ष सहमत नसल्याचं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे. तसंच राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यामुळे पोलीस खात्याचे खच्चीकरण झाले, या आरोपाचं त्यांनी खंडन केलं आहे. आबा हे चांगले गृहमंत्री असल्याचं सांगत आर. आर. पाटलांवर पोलीस खात्यातील सर्वांचाच पूर्ण विश्वास होता. त्यांनी खच्चीकरण नाही, तर उलट सर्वांचं मनोबल वाढवल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

विदर्भातील जनतेला जे हवं त्याच्या बाजूने राष्ट्रवादी असल्याचंही पवारांनी सांगितलं. मराठवाड्याचा प्रश्न सोडवायचा असेल, तर आधी पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा, त्यालाच प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असंही पवार म्हणाले. गेली 10 वर्षं केंद्रात असताना मी ऊस आणि साखरेचे भाव योग्य राहतील याची काळजी घेतली होती, मात्र केंद्रातून पायउतार झाल्यानंतर वर्षभरातच शेतकर्‍यांची दुरवस्था झाल्याची टीका पवारांनी मोदी सरकारवर केली आहे.केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी आत्महत्याप्रकरणी असंवेदनशील असून वास्तवाचं भान राखून सरकारने मदत करावी, असं आवाहन पवारांनी केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2015 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close