S M L

राज्यातील बहुतांश जिल्हा बँकेसाठी आज मतदान

Samruddha Bhambure | Updated On: May 5, 2015 01:50 PM IST

राज्यातील बहुतांश जिल्हा बँकेसाठी आज मतदान

05 मे : आज राज्यातल्या बहुतांश जिल्हा बँकांची निवडणूक होते आहे. जवळपास सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मुंबई, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग यासह अनेक जिल्हा बँकांमध्ये आज (मंगळवारी) राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचं सर्वस्व पणाला लागलं आहे.

मुंबई बँक निवडणुकीत भाजपचे प्रवीण दरेकर यांचं सहकार पॅनल विरूद्ध शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा अशी थेट लढत आहे. त्यामुळे प्रामुख्याने शिवसेना विरूद्ध भाजप अशी थेट लढत मुंबईत आहे. तर पुण्यात अजित पवार पुन्हा आपली सत्ता राखणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अहमदनगरमध्ये विखे विरूद्ध थोरात असा कलगीतुरा रंगलाय. त्यात विखेंना युतीची साथ आहे. कोल्हापूरात सतेज एकाकी पडलेत तर सिंधुदूर्गात राजन तेलींविरोधात वातावरण आहे. रत्नागिरीत राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला लागलं आहे. सांगलीत पतंगराव कदम यांच्याविरूद्ध संजयकाका आणि जयंत पाटील एकत्र आलं आहेत.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 संचालक मंडळासाठी आज मतदान होतं आहे. यात 5 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर उरलेल्या 14 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये पंकजा मुंडे गट विरुद्ध धनंजय मुंडे गट अशी चुरस आहे. त्याशिवाय इतर काही अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रावादीमधले दोन गट या निवडणुकीत भाजपच्या बाजूने आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्हा बँकेसाठीही अत्यंत चुरशीनं मतदानाला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेना भाजपनं आपलं पॅनेल तयार केलं आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरचे माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा मुलगा प्रा. संजय मंडलिक हे सेनेचे पदाधिकारी असूनही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या गटाशी हातमिळवणी केली. तर 147 कोटी रुपयांच्या नियमबाह्य कर्जामुळं गाजलेल्या प्रकरणामुळं आजी माजी संचालक अडचणीत येऊनही तेच संचालक आजही उमेदवार आहेत. 21 जागांपैकी 4 जागा बिनविरोध झाल्या असून 17 जागांसाठी 14 मतदानं केंद्रावर हे मतदान सुरुय. येत्या गुरुवारी मतमोजणी होणार असून त्याबाबत जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात उत्सुकता आहे.

सांगली जिल्हा बँक निवडणूक

- एकूण जागा - 19

- 2 जागा बिनविरोध

- रयत सहकारी पॅनल (पतंगराव कदम) - 17 उमेदवार

- शेतकरी सहकारी पॅनल (जयंत पाटीलसंजयकाका पाटीलमदन पाटील शिवसेना) - 19 उमेदवार

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक

- एकूण जागा - 18

- राणे पुरस्कृत काँग्रेसचं संकल्पसिद्धी पॅनल

- राजन तेलींचं सहकार वैभव पॅनल

रत्नागिरी जिल्हा बँक निवडणूक

- एकूण जागा - 20

- राष्ट्रवादीचं सहकार पॅनल

- शिवसेनेचं संकल्प पॅनल

बीड जिल्हा बँक निवडणूक

- एकूण जागा - 14

- 5 जागा बिनविरोध

- भाजप मित्रपक्ष विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत

- 37 उमेदवार रिंगणात

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक

- एकूण जागा - 17

- 4 जागा बिनविरोध

- काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप अशी लढत

मुंबै जिल्हा बँक निवडणूक

- एकूण जागा - 23

- प्रवीण दरेकरांचं सहकार पॅनल, दरेकरांची प्रतिष्ठा पणाला

- शिवसेनेचं शिवप्रेरणा पॅनल

पुणे जिल्हा बँक निवडणूक

- एकूण जागा - 15

- 6 जागा बिनविरोध

- सध्या बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व

अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक

- एकूण जागा - 15

- 6 जागा बिनविरोध (2 भाजप, 2 राष्ट्रवादी, 2 विखे गट)

- विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात अशी लढत

 परभणी जिल्हा बँक निवडणूक

- एकूण जागा - 15

- 6 जागा बिनविरोध

- रामप्रसाद बोर्डीकर विरुद्ध सुरेश देशमुख असा सामना

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2015 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close