S M L

'डॅडी'लगीन, मुलाच्या लग्नासाठी गवळी 15 दिवस जेलबाहेर

Sachin Salve | Updated On: May 5, 2015 03:09 PM IST

'डॅडी'लगीन, मुलाच्या लग्नासाठी गवळी 15 दिवस जेलबाहेर

arun_gavali_nagpur_jail05 मे : गँगस्टर अरुण गवळी अखेर मुलाच्या लग्नासाठी 15 दिवसांच्या पॅरोलवर जेलबाहेर आलाय. पॅरोल मंजूर झाल्यानंतर गवळी आज नागपूर जेलबाहेर पडला. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला पॅरोल मंजूर केला आहे. त्यामुळे डॅडी आता आपल्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे.

अरूण गवळीने त्यांच्या मुलाचं लग्न असल्याने 15 दिवसांचा पॅरोल मिळावा असा अर्ज सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर गवळीने नागपूर खंडपीठात अर्ज केला होता. त्यावर गुरुवारी पॅरोल मंजूर करण्यात आला. गवळीला दोन प्रकरणात शिक्षा झाली आहे. जन्मठेपेची शिक्षा आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात तसंच दादर येथील एका व्यापार्‍यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणात गवळी यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचे खटले मुंबई सेशन कोर्टातील विशेष मोक्का कोर्टात चालले. यावेळी कोर्टाने गवळीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गवळी ही शिक्षा नागपूर जेलमध्ये भोगत आहेत. अखेर आज अरूण गवळी 15 दिवसांच्या पॅरोलवर नागपूर जेलमधून बाहेर पडलाय.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2015 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close