S M L

कोर्टात काय घडलं?

Samruddha Bhambure | Updated On: May 6, 2015 06:29 PM IST

कोर्टात काय घडलं?

dasdas

06 मे : सलमान खान फुटपाथ अपघात प्रकरणी अखेर आज 13 वर्षांनंतर या खटल्यावर अंतिम सुनावणी सुरू आहे. कोर्टाने सलमान खानला या प्रकरणात दोषी ठरवलंय. त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केलीये. तर शिक्षा कमी करा पण दंड जास्त भरण्यास तयार आहोत अशी याचना सलमानच्या वकिलांनी केलीये. सलमानचा फैसला ऐकण्यासाठी कोर्टाबाहेर त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केलीये. नेमकं कोर्टाबाहेर काय घडलं ते पाहुया...


- कायद्याप्रमाणे सलमान खान उच्च न्यायालयात लगेच जाऊ शकतो - प्रदीप घरत

- गुन्ह्याचं स्वरुप पाहता आम्ही दहा वर्षांची शिक्षेची मागणी केली होती, सरकारी वकील प्रदीप घरत

- सलमानला आधी जेजे हॉस्पिटलमध्ये नेणार, वैद्यकीय तपासणीनंतर आर्थर रोड तुरूंगात करणार रवानगी

- पाच वर्षांची शिक्षा झाल्यामुळे सलमानला थेट कोठडीत नेलं जाणार - आभा सिंग

- निकालाची प्रत मिळाल्यावर सलमानला हायकोर्टात अपील करता येणार -आभा सिंग

- सलमानला पाच वर्षांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड

- सलमानची आजची रात्र ऑर्थर रोड जेलमध्ये

- सलमानला जामिनासाठी मुंबई हायकोर्टात करावा लागणार अर्ज

- सलमानला पोलिसांनी घेतलं ताब्यात

- सलमानला 5 वर्षांची शिक्षा

- कोर्टाने सुनावली सलमानला 5 वर्षांची शिक्षा, पोलिसांनी सलमानला घेतलं ताब्यात

- सलमानला 5 वर्षांची शिक्षा

- कोर्ट नंबर 52मध्ये सलमानच्या शिक्षेवर सुनावणी सुरू

- सलमानला कैदेत ठेवल्यास मानसिक धक्का बसेल, बचावपक्षानं केलं दुसरं मेडिकल सर्टिफिकेट सादर

- सलमानच्या छातीत दुखू लागलं, मेडिकल सर्टीफिकेट कोर्टात केलं सादर

- न्यायाधीशांनी निकाल ठेवला राखून, जेवणाच्या सुटीनंतर निकाल जाहीर होणार

- अशी कृत्य करणार्‍यांना धाक बसावा, अशी शिक्षा दिली जावी -सरकारी वकिलांची मागणी

- सलमानला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी - सरकारी वकिलांची मागणी

- मी सर्वसामान्य माणसाप्रमाणे खटल्याला सामोरे गेलो आहे, मला त्याप्रमाणेच शिक्षा व्हावी - सलमान

- सरकारी वकिलांनी सलमानला 10 वर्षं शिक्षा देण्याची मागणी केली

- मी बींग ह्यूमन ह्या सामाजिक संस्थेचा संस्थापक असून आतापर्यंत 42 कोटी या संस्थेच्या कामासाठी दिले आहेत -सलमान

- मी आतापर्यंत पुष्कळ सामाजिक काम केलेलं आहे, सलमानचा कोर्टात बचाव

- न्यायाधीशांनी पोलिसांना सर्वांना शांत करण्याचे दिले  आदेश

- पोलीस आणि प्रसारमाध्यमांमध्ये धक्काबुक्की

- कोर्ट रूमच्या बाहेर पोलीस आणि प्रसारमाध्यमांमध्ये वाद

- निकाल ऐकून सलमानची बहीण अर्पिताला कोर्टात रडू कोसळलं

- मला 2 वर्षांची शिक्षा आणि दंड द्यावा,सलमानची कोर्टाकडे याचना

- सामाजिक काम केलं, शिक्षा कमी करा, सलमानची कोर्टाकडे याचना

- कोर्टाने दोषी ठरवताच सलमानला रडू कोसळलं

- दोषी ठरवल्यानंतर सलमान घामाघूम, कोर्टात सलमानच्या बहिणींची रडारड

- सलमान खान मुंबई पोलीसांच्या ताब्यात

- सलामनचा भाऊ सोहेल खान आणि काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी कोर्टातून बाहेर पडले

- मी गाडी चालवतच नव्हतो - सलमान खान

- दोषी सिद्ध झाल्यानंतरही सलमानने फेटाळले आरोप

- 2002 मधील हिट अँड रनप्रकरणी सलमान खान सर्व आरोपांत दोषी - कोर्ट

- सुनावणीदरम्यान कोर्टाने दिला ऍलिस्टर परेरा आणि निखिल नंदा अपघात प्रकरणांचा दाखला

- सलमानवर304 (2) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध, काय होणार शिक्षा?

- सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध, काय होणार शिक्षा?

- कोर्टात आता सलमानच्या शिक्षेवर युक्तीवाद सुरू, शिक्षेची सुनावणी आजच होण्याची शक्यता

- कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर सलमानच्या वकीलांकडून कोर्टात युक्तीवाद सुरू

- सलमानच गाडी चालवत होता, ड्रायव्हिंग लायसन्स नसताना सलमान गाडी चालवत होता- कोर्ट

- सलमानवरील सर्व आरोप सिद्ध, सलमान दोषी - न्यायाधीश

- सलमानवरचे सर्व आरोप सिद्ध - न्यायाधीश

- सलमान खान दारुच्या अंमलाखाली गाडी चालवत होता - न्यायाधीश

- सलमानवरचे सर्व आरोप सिद्ध - न्या. डी. डब्ल्यू देशपांडे

- सलमान खान आरोपीच्या पिंजर्‍यात हजर

- सलमानचे कुटूंबीय आणि मित्र परीवार कोर्टरूमच्या बाहेर, नायाधिशांच्या प्रतिक्षेत

- तमिळ संघाची सेशन्स कोर्टाबाहेर निदर्शनं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2015 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close